अहमदनगर : बायोडिझेल प्रकरणी सहा आरोपींना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

अहमदनगर : बायोडिझेल प्रकरणी सहा आरोपींना अटक

अहमदनगर ः अहमदनगर शहराजवळून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावर बेकायदेशीर बायोडिझेल विक्री करणाऱ्या अड्ड्यांवर शहर अन्नधान्य पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी संयुक्तपणे छापा घालत तब्बल ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शहर अन्नधान्य पुरवठा विभाग व कोतवाली पोलिसांनी २२ ऑक्‍टोबर २०२१ रोजी केडगावातून जाणाऱ्या बाह्यवळण रस्त्यावर बायोडिझेल विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा घातला होता. पुरवठा निरीक्षक गिरीश मधुकर गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जीवनावश्‍यक वस्तू कायद्यासह कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी सोमवारी (ता. १५) रात्री व मंगळवारी (ता. १६) सकाळी सहा आरोपींना अटक केली आहे. आरोपी महेंद्र नरसू कोळेकर (वय ४७, रा. मुंबई), गौतम वसंत बेळगे (वय ३६, रा. झोडगे कॉलनी, भिंगार), भरत निवृत्ती कांडेकर (वय ३५, रा. केडगाव), मयूर प्रकाश बडे (वय २७, रा. तनपूरवाडी, ता. पाथर्डी, हल्ली रा. ओंकारनगर, केडगाव) यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा: कोरोनाबाबत माहिती न देणं पडलं महाग; 'ॲमझॉन'ला पाच लाखांचा दंड

आरोपी अमोल गोरक्ष आंबेकर (वय २५, रा. भोयरे पठार), संजय अशोक साबळे (वय ३३, रा. केडगाव) हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. राजेंद्र अशोक साबळे (रा. केडगाव) हा पसार झाला आहे.

loading image
go to top