Crime : धक्कादायक! राहुरीतून आठ दिवसांत सहा मुली गायब; पालकांमध्ये चिंतेचं वातावरण

Rape crime news
Rape crime newsesakal

राहुरी : मागील आठ दिवसांत तालुक्यातील तब्बल सहा मुलींना फूस लावून पळवून नेण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यात महिलांसह अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. त्यामुळे, पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राहुरी पोलिस ठाण्यात संबंधित पालकांनी फिर्यादी दिल्या आहेत.

Rape crime news
रोजगार हमीत भोंगळ कारभार; यंत्राने कामे करून कागदोपत्री मजुरांनी केली दाखविल्याचा प्रकार

राहुरी शहरातून गुरुवारी (ता. ४) रात्री बारा वाजता राहत्या घरातून १७ वर्षांची अल्पवयीन मुलगी गायब झाली. त्याच्या एक दिवस अगोदर अशाच प्रकारे एका गावातून सोळा वर्षे सहा महिने वयाची अल्पवयीन मुलगी गायब झाली. आठवडाभरात विविध गावांत असेच प्रकार घडले. त्यात, एका ४२ वर्षांच्या महिलेसह सज्ञान मुलींचा समावेश आहे.

किशोरवयीन शाळकरी मुलींना पाठलाग करुन, विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे. लग्नाचे आमिष दाखवून पळवून न्यायचे. अशा प्रकारांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Rape crime news
Noise Pollution: डीजे ठरला शिक्षकाच्या मृत्यूचं कारण! महिनाभरापासूनची झुंज ठरली अपयशी

मागील वर्षी तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शाळकरी मुलींना पाठलाग करून त्रास देणाऱ्या टवाळखोर तरुणांविरुद्ध मोहीम उघडली होती. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे, अशा प्रकारांना काहीसा चाप बसला होता. परंतु, पोलिस निरीक्षक दराडे यांच्या बदलीनंतर निर्भया अभियान थंडावले. पोलिसांनी पुन्हा ‘निर्भया अभियान’ राबवून अल्पवयीन मुली व महिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी पालकांतून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com