Ahmednagar : वारे गोवरचे ! घाबरू नका, पण काळजी घ्या

राज्यात गोवरचे रुग्ण वाढू लागले आहेत
गोवर
गोवरsakal

अहमदनगर : राज्यात गोवरचे रुग्ण वाढू लागले आहेत. विशेषतः मुंबई, औरंगाबाद, वर्धा जिल्ह्यांत रुग्ण वाढले आहेत. त्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील काही पालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे; मात्र जिल्ह्यात गोवर या आजाराचे लसीकरण चांगले असल्याने घाबरण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. असे असले, तरी इन्फेक्शन असलेल्या रुग्णांपासून इतर बालकांना दूर ठेवणे, काळजी घेणे आवश्यक आहे.

मागील आठवड्यात मुंबईत आठ रुग्ण आढळले. त्यानंतर औरंगाबादमध्ये संशयित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याचा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. नगर जिल्ह्यात अद्याप गोवरच्या एकाही रुग्णाची नोंद नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, शेजारील जिल्ह्यांत रुग्ण आढळत असल्याने काळजी घेण्याबाबतच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

बालरोगतज्ज्ञ संघटनेकडील मार्गदर्शक सूचना

- गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार आहे.

- पुरळसह ताप असलेल्या कोणत्याही मुलाबाबत माहिती सरकारला कळवावी.

- पाचपेक्षा जास्त रुग्ण एकाच भागात असल्यास त्या भागात विशेष पथक कार्य करते.

- बहुतेक सौम्य आणि मध्यम रुग्णांना देखरेखीसह होम आयसोलेशनमध्ये उपचार दिले पाहिजेत.

- फक्त गुंतागुंत किंवा जोखीम घटक असलेली गंभीर प्रकरणे हॉस्पिटलमध्ये दाखल करावीत.

- सशक्त देखरेखीचा एक भाग म्हणून जीनोम सिक्वेन्सिंगसाठी काही नमुने नियमितपणे पाठविले जावेत.

- डिसेंबर २०२३ पर्यंत ‘मिशन गोवर निर्मूलन’ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

- भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या सर्व ३५ हजार सदस्यांनी समाजात ९५ टक्क्यांहून अधिक दुसऱ्या डोसचे नियमित लसीकरण कव्हरेज मजबूत केले पाहिजे, अशा सूचना आहेत.

गोवरची लक्षणे व परिणाम

ताप येणे व चेहऱ्यावर आणि शरीरावर पुरळ पसरणे

सर्दी, खोकला, डोळ्यांच्या बुब्बुळाच्या पुढील भागात दाह होणे

गोवरमुळे लहान मुले, कुपोषित बालकांना ब्रॉन्कोप्न्यूमोनिया, गॅस्ट्रो, अंधत्व आणि एन्सेफलायटीस यांसारखी, गंभीर गुंतागुंत होऊ शकते.

एसएसपीई हा गोवरमुळे उशिरा होणारा मेंदूचा आजार आहे.

जिल्ह्यात अद्याप गोवरचे रुग्ण आढळलेले नाहीत. तथापि, तशी लक्षणे आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाला कळविण्याबाबतच्या सूचना सर्व रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात लसीकरण नियमित आहे. तसेच विशेष मोहीम राबवून लसीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.

- डॉ. संजय घोगरे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

देशपातळीवर गोवर प्रतिबंधावर बालरोगतज्ज्ञ संघटना काम करीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात रुग्ण नाहीत; परंतु बालकांची काळजी घ्यावी, तसेच लक्षणे आढळल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांना दाखवावे.

- डॉ. सुचित तांबोळी,

माजी कार्यकारिणी सदस्य, भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com