Sugarcane Rate: ऊसदरावर तोडगा नाहीच! विखे पाटलांच्या उपस्थितीत बैठक निष्फळ; महामार्ग रोखण्याचा शेतकऱ्यांचा इशारा

armers Warn of Sugarcane Transport Blockade in Ahmednagar: अहिल्यानगरमध्ये ऊसदरावरून संघर्ष पेटणार? दोन महामार्ग रोखण्यासह ऊस वाहतूक बंद करण्याचा इशारा
Sugarcane Farmers Warn of Highway Blockade in Ahmednagar After Second Meeting on Sugarcane Prices Ends Without Any Decision

Sugarcane Farmers Warn of Highway Blockade in Ahmednagar After Second Meeting on Sugarcane Prices Ends Without Any Decision

sakal

Updated on: 

-समीर दाणी

अहिल्यानगर: जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसदराबाबत कोणताही ठोस निर्णय होताना दिसत नाही. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी (ता.१२) झालेल्या दुसऱ्या बैठकीतही ठोस तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऊसदराचा प्रश्न मार्गी न लागल्यास जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख महामार्ग रोखण्यासह साखर कारखान्यांकडे जाणारी ऊस वाहतूक अडविण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊसदराचा हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...