अहमदनगर : कोंबडी चिरडल्याचा वाद थेट पोलिसांत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hen

अहमदनगर : कोंबडी चिरडल्याचा वाद थेट पोलिसांत

अहमदनगर (श्रीरामपूर) : तालुक्यातील एकलहरे परिसरातील आठवाडी भागात कारखाली कोंबडी चिरडल्याचा वाद थेट पोलिस ठाण्यात गेला. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादींवरून शहर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी नवाब सय्यद (वय ३६, रा. आठवाडी, एकलहरे) यांंच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात रवींद्र भानुदास बर्डे, सपना रवींद्र बर्डे, मंगल नाना बर्डे (सर्व रा. आठवाडी, एकलहरे) यांच्याविरोधात मंगळवारी (ता. १६) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. रवींद्र बर्डे यांच्या फिर्यादीवरुन नवाब सय्यद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

रविवारी (ता. १४) नऊ वाजेच्या सुमारास सय्यद यांच्या कारखाली (एमएच- ०४ डीआर- ५०८) कोंबडी चिरडली गेली. त्याची कारचालक सय्यद याच्याकडे विचारणा केली असता, त्याने शिवीगाळ करून धमकी दिल्याचे बर्डे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. असता त्याने शिवीगाळ करुन धमकी दिल्याचे बर्डे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे.

loading image
go to top