
अहिल्यानगर: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (पुणे) वतीने यंदाचे राज्यस्तरीय युवा साहित्य व नाट्य नाट्यसंमेलनाचे यजमानपद अहिल्यानगरच्या मसापच्या सावेडी उपनगर शाखेला मिळाले आहे. अहिल्यानगरमध्ये ११ व १२ सप्टेंबरला साहित्यिकांच्या मांदियाळीने हा साहित्योत्सव रंगणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखेला या संमेलनाचे यजमानपद नुकतेच बहाल करण्यात आले.