
अहिल्यानगर: राज्य सरकार मुंबईत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारत आहे. नगरमध्येही संविधान भवनासाठी १५ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. देशाची अखंडता डॉ. आंबेडकर यांच्यामुळे टिकून आहे. त्यांचा समता, बंधुत्वाचा विचार आपणा सर्वांना पुढे घेऊन जायचा आहे, त्यातच सर्वांचे हित आहे, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.