
अहिल्यानगर ः कोणत्याही व्यक्तीने एखादं विधान केलेलं असतं. ती पक्षाची भूमिका नसते. ती त्यांची वैयक्तिक भूमिका असते. मधल्या काळात विधिमंडळातील माझ्या एका सहकाऱ्याने एक वक्तव्य केलं. त्यांच्याशी मी बोललो. त्यांना सांगितलं की, ही आपल्या पक्षाची भूमिका नाही. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत म्हटले आहे. तसा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.