
अहिल्यानगर: माळीवाडा वेशीत क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले या दाम्पत्याचा पुतळा उभारला जाणार आहे. भावी पिढीसाठी तो प्रेरक ठरेल. प्रगत महाराष्ट्र व विकसित देशाचा पाया या दाम्पत्यानेच रचला. एत्तदेशीय मुलींसाठी पहिली शाळा या दाम्पत्याने सुरू केली. त्यापूर्वी सावित्रीबाईंनी अहिल्यानगर शहरात अध्यापनाचे धडे गिरवले होते. तो इतिहास या पुतळ्याने जागा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असेच विचार मांडले.