

Deputy CM Ajit Pawar inspecting the Pathardi rest house; expresses displeasure over poor condition and assures speedy development.
Sakal
पाथर्डी : विश्रामगृहाच्या आवारात असलेली घाण पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले. कोणते अधिकारी विश्रामगृहाची देखभाल करतात? त्यांची नावे मला पाठवा. या ठिकाणचे फोटो व शूटिंग काढून मला पाठवा. मी काय करायचे ते बघतो, शासनाच्या मालकीची ही जागा असून या जागेची देखभाल चांगल्या पद्धतीने व्हायला हवी, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.