

Ajit Pawar The Lighthouse Who Guided Generations of Leaders
Sakal
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे रुबाबदार अन् खमके नेतृत्व. मनात काही ठेवणार नाही अन् बोलताना कुणाची भीडभाड बाळगणार नाही. प्रशासनावर हुकूमत होतीच. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत खडानखडा माहिती असणारा अनुभवी नेता. माझ्यासारख्या अनेक युवा आमदारांचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक. त्यांच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच अवघा महाराष्ट्र हळहळला. महाराष्ट्राच्या शहरी प्रश्नांबरोबरच शेती आणि सहकाराची जाण असलेला अस्सल ग्रामीण चेहरा हरपला. मी तर खंबीर पाठीराखा गमावला. ते माझ्या राजकीय जीवनातील दीपस्तंभ होते. त्यांच्या निधनामुळे महाराष्ट्राबरोबरच काळे परिवाराचीदेखील हानी झाली.
आशुतोष काळे, आमदार