Akole Vidhan sabha Election2024 sakal
अहिल्यानगर
Akole Assembly Election : महायुती, आघाडीची अग्निपरीक्षा! अकोलेत पंचरंगी लढतीने रंगत, नऊ उमेदवार रिंगणात
अकोले विधानसभा निवडणूक आज अर्ज माघारीत १२ पैकी तीन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून, नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. खरी लढत पंचरंगी होणार असल्याचे चित्र समोर आले आहे.
अकोले - विधानसभा निवडणूक आज अर्ज माघारीत १२ पैकी तीन अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली असून, नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. खरी लढत पंचरंगी होणार असल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपमधील बंडखोरांनी आपले अर्ज मागे न घेतल्याने महाविकास आघाडी व महायुती उमेदवारांचे गणित बिघडणार असून त्यांना अग्नीपरीक्षा द्यावी लागणार आहे.