अकोले : मुसळधार पावसामुळे पिके सडली

आदिवासी भागातील हा पाऊस तिप्पट आहे.
nagar
nagarअमित गवळे

अकोले : गेल्या पंधरा दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या धुव्वाधार पावसाने सोयाबीन पिके सडली आहेत. बागायती पिकेदेखील शेवटची घटका मोजत आहेत.कोतूळसह परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून सतत जोरदार पाऊस सुरू आहे. पंधरा दिवसांपासून सूर्य दर्शनही झाले नाही. सलग पंधरा दिवसांत या परिसरात पंधरा इंच पाऊस झाला. आदिवासी भागातील हा पाऊस तिप्पट आहे. त्यामुळे नुकतेच पेरणी केलेल्या सोयाबीन, भुईमूग, भात रोपे व इतर कोरडवाहू पिके पावसाने पिवळी पडली आहेत. काही ठिकाणी शेतात पाणी साचल्याने ती सडली आहेत.

बागायती पिकांत झेंडू, कारली, कोबी या पिकांचे मोठे नुकसान झाले. पाऊस उघडला तरी पंधरा दिवस शेतातील पाणी कमी होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे.

कोतूळ परिसरात गेल्या दहा वर्षांत सतत पंधरा दिवस पाऊस पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोयाबीन उगवायला सुरवात झाली आणि पाऊस सुरू झाला. आज सर्व शेतांमध्ये तुडुंब पाणी भरले आहे. त्यामुळे सोयाबीन व खरिपाची पिकं सडून गेली, अशी प्रतिक्रिया मंगेश देशमुख यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com