अकोले : न. पं. निवडणुकीत भाजपाचीच सत्ता येणार - वैभव पिचड

अकोले नगरपंचायत निवडणूकी साठी भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
वैभव पिचड
वैभव पिचड

अकोले (अहमदनगर) : मोठे शक्ती प्रदर्शन करीत भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली अकोले नगरपंचायत निवडणूकी साठी भाजपच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. तर दुसरीकडे महाविकास आघाडी होणार की नाही या बाबत अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. नगरपंचायत निवडणुकीत मोठ्या मताधिकक्य व बहुमताने भाजपचा झेंडा पुन्हा एकदा नगरपंचायत वर फडकविला जाणार असा विश्वास माजी आमदार पिचड यांनी व्यक्त केला. केंद्र व राज्यातील आरपीआय आठवले गटाने अकोलेतही भाजपला पाठिंबा दिला आहे.

अकोले नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असुन आज भारतीय जनता पार्टीने माजी आमदार .वैभवराव पिचड यांचे नेतृत्वाखाली मोठे शक्ती प्रदर्शन करत बहुतांश प्रभागातील उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीत आघाडी घेतली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे अद्याप जागा वाटप स्पष्ठ झालेले नाही. कोणत्या पक्षाला कोणता प्रभाग हेही निश्चित झालेले नाही.त्यामुळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

वैभव पिचड
सातारा : शेरेवाडीजवळील अपघातात गोंदवलेचे बहीण-भाऊ ठार

अकोले नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 21 डिसेंबर 2021 रोजी होत असुन त्यासाठी नामनिर्देशन पत्र ( उमेदवारी अर्ज) भरण्यासाठी आज आणि उद्या मंगळवार अशी दोन दिवस बाकी असताना आज भारतीय जनता पार्टीच्या वतिने मा.आ. पिचड यांचे नेतृत्वाखाली मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले.सकाळी अकोलेतील भाजपा पक्ष कार्यालय पासून मोठ्या संख्येने कार्यकर्ते घोषणा देत तहसिल कार्यालयात आले. यावेळी मा.आ.पिचड यांचे उपस्थितीत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले.

यावेळी कैलासराव वाकचाैरे, भाजपा जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ,ॲड वसंतराव मनकर,तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, माजी नगराध्यक्ष ॲड के.डी.धुमाळ, पं स च्या सभापती उर्मिला राऊत,उपसभापती दत्ता देशमुख, माजी सभापती भानुदास गायकर, विजय भांगरे,रमेश धुमाळ, सुधाकरराव देशमुख, भाजपचे नितीन जोशी,धनंजय संत, रोहिदास धुमाळ, रमेश नाईकवाडी, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, सचिन शेटे, परशराम शेळके, सोनालीताई नाईकवाडी, यशवंतराव आभाळे,राहुल देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे,शंभू नेहे,राज गवांदे,अमोल वैद्य, हितेश कुंभार, हैदर पठाण,मोहसिन शेख,हुसेन मंन्सुरी,आर पी आय चे नेते चंद्रकांत सरोदे, शांताराम संगारे, कळसचे सरपंच राजेद्र गवांदे, निखिल जगताप,अनिल नाईकवाडी, डॉ निवृत्ती नाईकवाडी शरद नवले,विजय पवार,हिम्मत मोहिते,बबलू धुमाळ,सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

मा.आ. पिचड म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यासह शहरातील जनतेला खुप अपेक्षा होत्या मात्र दोन वर्षात जनतेचा भ्रमनिरास झाला आहे.दोन वर्षात त्रस्त झालेली जनता पुन्हा आपल्या पाठीशी उभी राहिली असल्याने येत्या नगरपंचायत निवडणूकीत आपल्या भारतीय जनता पार्टीचीच सत्ता येणार असल्याचा दावा करून तालुक्यातील महाविकास आघाडी हि आघाडी नसून तिन तिघाडा काम बिघाडा आहे अशी टीका त्यांनी केली.तालुक्यातील गोरगरिबांचे धान्य चोर कोण आहे हे जनतेने पाहीले असल्याचा टोमणा ही त्यांनी मारला.

तालुक्यातील जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा त्यांना विसर पडला आहे .यांना अतिवृष्टीने होळपळणारा शेतकरी आज दिसत नाही. तसेच तालुक्यातील गोरगरिबांचे धान्य चोरणारे कोण आहे हे ही आता जनतेला माहित झाले आहे त्यामुळे त्यांची जागा येत्या नगरपंचायत निवडणुकीत जनता त्यांना दाखवून देईल असा विश्वास पिचड यांनी व्यक्त केला.

वैभव पिचड
चाकूच्या धाकाने गोंदवल्यात लूट; रोख रकमेसह दागिन्यांची चोरी

रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) चा नगरपंचायत निवडणुकीत भाजपाला पाठिंबा -

अकोले नगरपंचायत निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे.नगरपंचायतच्या सर्वच्या सर्व १७ प्रभागात भाजपाच्या चिन्हावर सर्व उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न करणार असुन आम्हाला अपेक्षा नाही मात्र एक जागा आम्हाला मिळेल असा विश्वास आर.पी.आय चे नेते विजयराव वाकचाैरे यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com