Lumpy virus: अकोलेत लम्पीचा शिरकाव २० जनावरांना लागण; शेतकरी हवालदिल
Lumpy Virus Hits Akole: कीटकांपासून होणाऱ्या लम्पी त्वचा रोग हा गोवंश वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचारोग आहे. हा आजार जनावरांपासून मानवास संक्रमित होत नाही. लम्पी स्कीन हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार आहे, तसेच जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा, जनावरांना गोचीड पासून मुक्त ठेवावे.
Lumpy outbreak in Akole: 20 cattle infected, farmers distressed.Sakal
अकोले : जिल्ह्यात वाढलेल्या लम्पीचा अखेर अकोले तालुक्यात शिरकाव झाला आहे, लम्पीसदृश आजाराची लक्षणे असलेली २० जनावरे आढळून आली आहेत. अनेक गावातील गुरांना लम्पीची लागण झाली असून, राजूर येथील पशुधन अधिकारी शोधून सापडत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहेत.