esakal | भाजप काँग्रेसचेही वचन पूर्ण करत आहे : सीताराम भांगरे
sakal

बोलून बातमी शोधा

Akole taluka BJP president criticizes Congress over agriculture bill

स्वतः च्या पक्षाने दिलेली वचने तर पूर्ण करतच आहेत, विरोधी पक्षाचे घोषणापत्र वाचून त्यात त्यांनी दिलेली वचने पण पूर्ण करत आहेत, असे असतांना काँग्रेस कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे.

भाजप काँग्रेसचेही वचन पूर्ण करत आहे : सीताराम भांगरे

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : स्वतः च्या पक्षाने दिलेली वचने तर पूर्ण करतच आहेत, विरोधी पक्षाचे घोषणापत्र वाचून त्यात त्यांनी दिलेली वचने पण पूर्ण करत आहेत, असे असतांना काँग्रेस कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहे. या चोरांच्या उलट्या बोंबा असल्याचा आरोप भाजप तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने ऐतिहासिक शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन व सुलभता) विधेयक, 2020, शेतमाल हमी भाव व शेती सेवा करार (सबलीकरण आणि संरक्षण) विधेयक, 2020 आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, 2020 ही विधेयके लोकसभेत पास केली आहेत. ही विधेयके शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दलाल आणि इतर सर्व अडथळ्यांपासून मुक्त करेल. या कृषी सुधारणांमुळे शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकायला नवीन संधी मिळतील. यामुळे त्यांचा नफा वाढेल. याद्वारे कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळेल आणि शेतकरी सक्षम होईल! 

शेतकरी स्वतःच्या मर्जीचा मालक असेल. शेतकऱ्याला आपला शेतमाल थेट विकण्याचे स्वातंत्र्य असेल. कर न लावल्यामुळे शेतकर्‍यांना अधिक भाव मिळेल आणि नागरिकांनाही कमी किंमतीत माल मिळेल. खासगी गुंतवणूकीमुळे शेतीला गती येईल, रोजगार वाढेल आणि अर्थव्यवस्था बळकट होईल. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी आणलेल्या कायद्याचे देशात स्वागत होत आहे. काँग्रेसचा 2019 च्या निवडणुकीतील वचननामा 100 टक्के बरोबर आहे की नाही हे तपासून स्वतःच खात्री करून घ्या. 

मोदी सरकारने जे कायदे आणले आहेत. ते मुद्दे काँग्रेस पक्षाच्या 2019 लोकसभा निवडणुकीसाठी काढलेल्या घोषणापत्रात एकदम 'जसे च्या तसे' आहेत! 'निवडून आलो तर हे सगळं करू' असं शेतकऱ्यांना वचन दिलं होतं काँग्रेसने. काँग्रेसचं वचन मोदी पूर्ण करत आहेत.

आजवर मोदींसारखा पंतप्रधान देशातच नाही तर जगात कुठेही झाला नाही आणि पुढची पन्नास वर्षे होणारही नाही- जो स्वतःच्या पक्षाने दिलेली वचनं तर पूर्ण करतच आहेत, विरोधी पक्षाचे घोषणापत्र वाचून त्यात त्यांनी दिलेली वचने पण पूर्ण करत आहे. स्वतः सत्तेत असताना तुम्हाला तुमचा वचननामा पूर्ण करता आला नाही, आता मोदी सरकारने तुमचाच वचननामा पूर्ण केला तर तुम्ही त्यांचे आभार मानण्याऐवजी हा कायदा शेतकरी विरोधी असल्याचे सांगून चोराच्या उलट्या बोनबा मारीत आहे, असा आरोप सीताराम भांगरे यांनी केला आहे.

संपादन : अशोक मुरुमकर