Anganvadi Strick: तोडगा निघेना, ताई अंगणवाडी उघडेना! आंदोलनाची धग कायम; नऊ हजार कर्मचारी संपावर

Anganvadi Strick: त्यामुळे संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासनातील सूत्रांनी ४०० सेविका कर्तव्यावर असल्याचे सांगितले.
Anganvadi Strick
Anganvadi Stricksakal

अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात पोषण आहाराचे काम ठप्प आहे. तब्बल महिन्यापासून आंदोलन धगधगते आहे. सेवा समाप्तीच्या नोटिसा पाठवल्यानंतरही आंदोलनाची धग अंगणवाडी सेविकांनी कमी होऊ दिलेली नाही. तब्बल नऊ हजार अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर आहेत. एकंदरीत तोडगा निघत नसल्याने अंगणवाडीचे कुलूप अद्यापि उघडलेले नाही.

गेल्या डिसेंबर महिन्यापासून अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे पोषण आहारासह विविध कामे खोळंबली आहेत. जिल्ह्यात एकूण सात संघटना आहेत. या सर्व संघटना संपात सहभागी आहेत. त्यामुळे संपाला शंभर टक्के प्रतिसाद मिळत असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासनातील सूत्रांनी ४०० सेविका कर्तव्यावर असल्याचे सांगितले.

Anganvadi Strick
Contract Worker Strick : एकच नारा-कायम करा; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विराट मोर्चाने धुळे शहर दणाणले

दरम्यान, महिला व बालकल्याण विभागाने सेविकांना कामावर हजर न झाल्यास सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. दोन दिवसांत तब्बल अडीच हजार सेविकांना या नोटिसा बजावल्याचे सांगण्यात आले, तरीही सेविकांचे कामावर हजर होण्याचे प्रमाण नगण्यच आहे.

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ, साईश्रद्धा, अंगणवाडी सेविका मदतनीस आदी संघटना या संपात सहभागी आहेत.

काम ठप्प असल्याने प्रशासनाने संबंधित गावांतील अंगणवाडीतील मुलांना ग्रामपंचायतीतर्फे, तसेच शालेय पोषण आहारासोबत आहार वाटप केला जात असल्याचा दावा केला आहे. परंतु जिल्हा परिषद प्रशासन खोटे बोलत आहे, असे संपात सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Anganvadi Strick
Worker's Strick : वालचंदनगरमध्ये कामगारांचे थकीत वेतनासाठी आंदोलन !

संपाचा परिणाम काय

या संपामुळे २ लाख ९७ हजार बालकांच्या पोषण आहाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मुलांचा पोषण आहार देणे, गर्भवती माता, स्तनदा मातांचा पोषण आहार पुरविला जातो. हे काम ४ डिसेंबरपासून ठप्प झाले आहे. मानधनात वाढ करणे, निवृत्तिवेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे आदी या सेविकांच्या मागण्या आहेत.

सेविका दृष्टिक्षेपात

अंगणवाडीसेविका - ५ हजार ३७५

मिनी अंगणवाडी सेविका - ७९२

मदतनीस - ४ हजार ५१०

एकूण - ९ हजार ६९८

Anganvadi Strick
Sambhaji Nagar News : महापालिकेपुढे ३० टक्के स्वहिश्श्याचा पेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com