
Banjara community members marching to Pathardi Tehsil office demanding justice and constitutional rights.
Sakal
पाथर्डी: राज्यातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी सकल बंजारा समाजाने बुधवारी (ता.१०) तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर मोर्चाला तहसीलदार डॉ. उद्धव नाईक सामोरे गेले व त्यांनी मोर्चेकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.