esakal | ...तर केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकारही कोसळेल - अण्णा हजारे
sakal

बोलून बातमी शोधा

modi government

...तर मोदी सरकारही कोसळेल - अण्णा हजारे

sakal_logo
By
एकनाथ भालेकर

राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली आहेत. मात्र त्यानंतरही देशाची अवस्था ठीक नाही. स्वातंत्र्यापूर्वी देशाला लुटणारे बाहेरील होते. आज देशाला लुटणारे देशातीलच आहेत. त्यामुळे संपूर्ण देशात चारित्र्यशील व सामाजिक दृष्टिकोन ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रीय संघटन होणे ही काळाची गरज आहे. देशातील जनता जागी झाली, तर केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकारही पडू शकते, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

हेही वाचा: गुड न्यूज : पाणी संकट टळले! नगर, नाशिकची धरणे भरली

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करीत आहे. दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी एक दिवसाचे उपोषण केले. मात्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अजिबात गंभीर नाही. शेतकऱ्यांच्या हितासाठी एमएसपी लागू करायला पाहिजे. राळेगणसिद्धी येथे आयोजित राष्ट्रीय कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते. ते म्हणाले, पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा, यामागे सर्व राजकीय पक्ष पळत आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षापासून देशाला उज्ज्वल भविष्य नाही. स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार असा घेऊन अनेक राजकीय पक्ष काम करीत आहेत. त्यांच्यावर जनतेने दबाव निर्माण करावा. याशिवाय देशाला वाचविण्यासाठी दुसरा मार्ग नाही.

हेही वाचा: नगर : सर्वपक्षीय कार्यकर्ते चक्क खड्ड्यात बसून गोट्या खेळले!

यावेळी देशभरातील १४ राज्यांतील ८६ कार्यकर्त्यांनी शिबिरात सहभाग घेतला होता. जगदीश प्रसाद सोलंकी (दिल्ली), रामपाल जाट (राजस्थान), भोपालसिंह चौधरी (उत्तराखंड), कल्पना इनामदार (मुंबई), योगेंद्र पारीख (राजस्थान), अशोक सब्बन (महाराष्ट्र), दशरथभाई (राजस्थान), विकल पचार (हरियाणा), विष्णू प्रसाद बराल (आसाम), दयानंद पाटील (कर्नाटक) प्रवीण भारतीय (उत्तर प्रदेश), अशोक मालिक (हरियाणा) आदींसह देशभरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image
go to top