esakal | अहमदनगर : सर्वपक्षीय कार्यकर्ते चक्क खड्ड्यात बसून गोट्या खेळले!
sakal

बोलून बातमी शोधा

political news

नगर : सर्वपक्षीय कार्यकर्ते चक्क खड्ड्यात बसून गोट्या खेळले!

sakal_logo
By
गौरव साळुंके

श्रीरामपूर (जि.अहमदनगर) : भाजपाचे अशोक लोंढे (bjp) यांच्या नेतृत्वाखाली येथे रस्त्यावरील खड्यात बसून नुकतेच सर्वपक्षीय गोट्या खेळो आंदोलन झाले. यामुळे जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला.

जिल्ह्यात चर्चेचा विषय

श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. अनेकदा आंदोलन करुनही लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ या प्रसंगी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप, रिपब्लिकन पक्षाचे तालुका संघटक संजय बोरगे, प्रहारचे शहर अध्यक्ष सागर दुपाटी, कामगार नेते बबन माघाडे, ग्रामपंचायत सदस्य किरण खंडागळे, भाजपचे युवा नेते सुनिल निकम, संजय शिरसाठ यांनी आंदोलनाद्वारे संबधीत विभागाचे लक्ष वेधले. रस्ता दुरुस्तीसाठी लोंढे यांनी सहकाऱ्यांसमवेत रस्त्यावर भिक मांगो आंदोलन केले, मुंडन आंदोलन, रस्त्यात झाडे लावून आंदोलन, रस्त्यावर झोपून आंदोलनासह अनेक आंदोलन करूनही अद्याप रस्ता दुरुस्ती न झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे रस्त्यावरील खड्यात बसून सर्वपक्षीय गोट्या खेळो आंदोलन करुन सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधीचे लक्ष वेधण्यात आले. आंदोलनात ​संतोष निकम, संजय थोरात, सचिन शिंदे, अमोल जाधव, विश्वास कोळगे, वाल्मीक निकम, प्रदिप शेळके, राजु त्रिभुवन, स्वप्नील सोनार यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा: पत्नीच्या प्रियकराची कबुली; पतीची सासुरवाडीत आत्महत्या

श्रीरामपूर ते दत्तनगर पर्यंत रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी रोज अनेक लहान-मोठे अपघात घडतात. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

हेही वाचा: कंठ दाटून आला, हुंदका अनावर झाला !

loading image
go to top