अण्णा हजारेंकडून आमदार निलेश लंके यांच्या कामाची प्रशंसा

मार्तंड बुचुडे
Wednesday, 18 November 2020

समाजसेवा हीच खऱी ईश्वर सेवा आहे. तुम्ही या समाजसेवेचे चांगले काम करत आहात त्यातून मिळणारा आनंद हा अगळा वेगळा असतो तो कोणालाही मिळत नाही.

पारनेर (अहमदनगर) : समाजसेवा हीच खऱी ईश्वर सेवा आहे. तुम्ही या समाजसेवेचे चांगले काम करत आहात त्यातून मिळणारा आनंद हा अगळा वेगळा असतो तो कोणालाही मिळत नाही.

मात्र ही समाजसेवा करत असताना तुम्ही स्वताःच्या आरोग्याकडे तसेच कुटुंबाकडेही लक्ष द्या व त्यांनाही वेळ द्या. कारण अशा प्रकारे समाजसेवा करणारी माणसं समाजात खूप कमी आहेत. म्हणून अशी समाजसेवा करणा-या माणसांची ख-या अर्थाने समाजाला गरज आहे असे प्रतिपादन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

आमदार निलेश लंके यांनी हजारे यांची राळेगणसिद्धी येथे सदिच्छा भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते. या वेळी लंके यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची माहिती हजारे यांनी दिली तसेच टाकळी ढोकेश्वर येथील कोविड सेंटर बाबत माहिती सांगून गोरगरिबांना कोरोनावरील उपचार न परवडणारा होता त्यामुळे आम्ही टाकळी ढोकेशेवर येथे कोरोना सेंटर ऊभे केले होते. त्यातून गोरगरीबांचे लाखो रूपये वाचले आहेत. अनेकांना या आजारातून बरे करण्याची सेवा करण्याची या मुळे मला संधी मिळाली असल्याचेही लंके यांनी सांगीतले. तेसच आगामी काळात तालुक्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत त्यातील जास्तीतजास्त निवडणुका बिनविरोध करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही सांगीतले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या वेळी हजारे यांनी कोरोना काळात केलेल्या आमदार लंके यांच्या कामाची वाहावा केली. अशाच प्रकारचे काम समाजाला अपेक्षीत आहे असे सांगून ग्रामपंचायत निवडणुकांमुळे गावागवात गटबाजी भांडणे वाद होतात व त्यातून भाऊबंदकी सुरू होते. त्यामुळे गावाचा विकास थांबतो त्यासाठी ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या तर गावाच्या विकासास चालना मिळेल असेही सांगीतले. या वेळी लंके यांच्या समावेत माजी सरपंच जयसिंग मापारी, दत्ता आवारी, सॉलिसिटर विकास पोटघन, विवेक पोटघन, भगवान पठारे , राहुल खामकर, विलास औटी ,योगेश मापारी उपस्थित होते.

आमदार लंके यांनी आपण पारनेर-नगर विधानसभा मतदार संघात गेली वर्षभरातील केलेल्या कामाचा आलेखही हजारे यांच्या समोर मांडला. त्यावेळी हजारे यांनी एका वर्षात तुम्ही जे मतदार संघातील जनतेसाठी काम केले ते खरोखरच वाखणण्याजोगे आहे अशी प्रतिक्रीया या वेळी व्यक्त केली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anna Hazare praises MLA Nilesh Lanke work