मैल कामगार झाले झेडपीच्या अधिकाऱ्यांचे घरगडी

दौलत झावरे
रविवार, 5 जुलै 2020

रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे मैल कामगारांची भरती केली जात होती. या मैल कामगारांकडून रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती केली जात होती. परंतु शासनाने हे पद भरणे आता बंद केले आहे. त्याच मैल कामगारांकडून सध्या कामकाज करून घेतले जात आहे.

नगर  : रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे मैल कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, सध्या मैल कामगारांना रस्त्यांची देखभाल-दुरुस्तीची कामे देण्याऐवजी इतरत्र कामे दिली जात आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या दुरवस्थेत आणखीच भर पडत आहे. 

रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे मैल कामगारांची भरती केली जात होती. या मैल कामगारांकडून रस्त्यांची देखभाल, दुरुस्ती केली जात होती. परंतु शासनाने हे पद भरणे आता बंद केले आहे. त्याच मैल कामगारांकडून सध्या कामकाज करून घेतले जात आहे.

अवश्य वाचा ः सन्मान नाही करता आला तर अपमान तरी करू नका

जिल्हा परिषद व पंचायत समितीकडून रस्त्यांची कामे ठेकेदाराकडून करून घेतली जात असल्यामुळे मैल कामगारांची आवश्‍यकता भासत नाही. आहे त्या कामगारांना रस्त्यांची देखभाल दुरुस्ती देण्याऐवजी आता जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांकडून इतर कामे दिली जात आहेत.

अनेकांनी ही कामे नको मूळच कामे द्या, अशी मागणी केली. मात्र, प्रशासनाकडे अनेकदा दुर्लक्ष केले असून, काहीजण त्यातच सेवानिवृत्तही झाले आहेत. 

क्लिक करा ः अभ्यासातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते ः जगताप

नगर तालुका पंचायत समितीअंतर्गत 11 मैल कामगार असून, त्यांना रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम देण्याऐवजी आता अधिकाऱ्यांच्या दिमतीला ठेवण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचारी परिसरात अस्वच्छता झाल्यानंतर या कामगारांना बोलावून त्यांच्याकडून तेथील स्वच्छता करून घेतली जात आहे.

त्याचबरोबर निवासस्थानांच्या डागडुजीची कामेही याच कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जात असून, काही अधिकाऱ्यांची व्यक्तिगत कामे या कर्मचाऱ्यांकडून करून घेतली जात असल्याचे बोलले जात आहे. नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करणार्यांकडून मात्र सामान्यांवर अन्याय केला जात आहे.  

मैल कामगारांना त्यांच्या मूळ कामावर पाठवावे, असे पत्र दोन वर्षांपूर्वी पंचायत समितीचे तत्कालीन सभापती रामदास भोर यांनी जिल्हा परिषदेला दिले होते. दरम्यान, या संदर्भात जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांच्याशी प्रतिक्रियेशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. 

नगर तालुक्‍यातील मैल कामगारांना मूळ पदावर त्वरित द्यावे, अशी आपली अनेक दिवसांची मागणी असून, प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. 
- रामदास भोर, माजी पंचायत समिती सभापती , अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appointment of mile workers to officers Dimti