The honor could not be done So don't insult
The honor could not be done So don't insult

सन्मान नाही करता आला  तर अपमान तरी करू नका 

Published on

नगर  : विद्यार्थ्यांना घडविण्यात आई-वडिलांपेक्षा शिक्षकांचे योगदान मोठे आहे. पिढ्यान्‌-पिढ्या गुरुजनांकडून हेच काम सुरू आहे. मात्र, आता पूर्वीप्रमाणे गुरुजनांचा सन्मान कमी झाला आहे. अवमान करण्याच्या घटना वाढत आहेत. याबाबत शिक्षकांमधून खंत व्यक्त होत असून, सन्मान नाही करता आला तरी चालेल; पण अवमान तरी करू नका, असे बोल आता शिक्षकांच्या मुखातून निघत आहेत.

"छडी लागे छम छम विद्या येई घम घम' असे पूर्वी म्हटले जात होते. विद्यार्थ्यांना छडीच्या धाकाने शिस्त राहत होती. मात्र, आता छडीचा वापर करण्यावर बंधन आल्याने शाळांमधून छडी गायबच झाली आहे. समाजातून संस्कार लोप पावत चालल्यामुळेच त्यांच्याकडून गुरुजनांविषयी बोलताना "मास्तरडे'सारखे अपमानजनक शब्द वापरून अनादर केला जातो.

हे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालल्याने शिक्षकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. कुंभाराप्रमाणेच गुरुजन मातीसारख्या गोळ्याला आकार देऊन त्याला समाजात चांगले स्थान मिळवून देत आहेत. मात्र, वैचारिकता हरपलेल्यांकडून अनादर सुरू झाला आहे. हे मात्र शिक्षकांच्या मनाला टोचत आहे. 

शिक्षकांनी अनेकांच्या आयुष्याला दिशा दिली आहे. जगण्याचा प्रकाश दाखविला आहे. उत्तम शिक्षक नसते, तर समाज उद्‌ध्वस्त झाला असता. मात्र, दुर्जन व अपप्रवृत्तीचे लोक शिक्षकांचा अवमानकारक उल्लेख करतात. असे लोक आपल्या आई-वडिलांचाही सन्मान करू शकत नाहीत. 
- डॉ. संजय कळमकर, ज्येष्ठ साहित्यिक 
 
गुरुजन हे आपल्या आई-वडिलांच्या स्थानी असतात. त्यामुळे प्रत्येकाने त्यांच्याविषयी आदराने बोलणे गरजेचे आहे. 
- सुनील पंडित, जिल्हाध्यक्ष, मुख्याध्यापक संघ 
 
गुरुपौर्णिमेला गुरुजनांविषयी आदर व्यक्त करून त्यांचे पूजन केले जाते. हे फक्त एकाच दिवसाचे न राहाता गुरुजनांविषयीचा आदर वर्षानुवर्षे तसाच राहून, रोज गुरुपौर्णिमा साजरी होणे गरजेचे आहे. ज्यांना शिक्षकांचा आदर करता येत नसेल, त्यांनी किमान अनादर तरी करू नये. 
- सखाराम गारुडकर, शहराध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com