व्हाईट हाऊस अन ट्रम्पबाईही झाल्या अवाक्, नगरच्या चिमुरडीने केलंच असं काम!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 29 August 2020

"महिला या सर्व मतदारांना जगात आणतात, त्यांना मतदानाचा हक्क द्या' असा संदेश तिने चित्राद्वारे दिला. अमेरिकेतील वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली आहे. "व्हाइट हाऊस'पासून राज्याच्या महापौरांपर्यंत कौतुकाच्या वर्षावाने पांडे कुटुंबीय आनंदित झाले आहे. 

नगर : सध्या अमेरिकास्थित स्निग्धा पटनी-पांडे यांची कन्या तनिष्का हिने वयाच्या केवळ सातव्या वर्षी "व्हाइट हाऊस' येथे भरलेल्या कलाप्रदर्शनात स्थान पटकाविले.

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी "स्त्रियांचा मतदान हक्काचे 100 वर्षे' या विषयावर हे प्रदर्शन भरविले होते. 24 ऑगस्ट रोजी झालेल्या या प्रदर्शनात अमेरिकेतील 50 राज्यांतून प्रत्येकी एक चित्र निवडण्यात आले.

भारतीय वंशाच्या तनिष्काला चित्र सादर करण्याची संधी मिळाल्याने सर्वांचीच मान अभिमानाने उंचावली. वयाच्या केवळ पाचव्या वर्षांपासून तनिष्काला चित्रकलेची आवड निर्माण झाली. आई-वडिलांनी तिला त्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. दोघांनीही या विषयाचा इतिहास समजून सांगत, तनिष्काच्या विचारांना गती देत, हे गहन अर्थ असणारे चित्र सादर करायला मदत केली.

हेही वाचा - उद्धवा दार उघड आता दार उघड

"महिला या सर्व मतदारांना जगात आणतात, त्यांना मतदानाचा हक्क द्या' असा संदेश तिने चित्राद्वारे दिला. अमेरिकेतील वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली आहे. "व्हाइट हाऊस'पासून राज्याच्या महापौरांपर्यंत कौतुकाच्या वर्षावाने पांडे कुटुंबीय आनंदित झाले आहे. 

नगरच्या पेमराज सारडा कॉलेजचे प्रा (स्व.) हिरालाल पटनी व प्रेमलता पटनी यांची कन्या स्निग्धा पटनी व साताऱ्याचे नीलेश पांडे यांची तनिष्का मुलगी आहे. हे जोडपे 2006पासून अमेरिकास्थित असून, दोघेही कॅटरपिलर कंपनीत उच्चपदस्थ आहेत. तनिष्काचे मामा सिद्धार्थ पटनी हे नगरमध्ये प्रसिद्ध सीए आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Appreciation of a picture taken by a girl from Ahmednagar in the White House