
नगर तालुका: निमगाव वाघा येथे २२ ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास चार चोरट्यांनी घरात घुसून गाढ झोपेत असलेल्या व्यक्तींवर धारदार हत्यारांनी हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न करत १ लाख ३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. चोरट्यांच्या हल्ल्यात अनिल मारुती गुंजाळ (वय ४२) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरी व खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.