

Leopard Menace in Rahuri: Farmers Guard Fields with Guns
sakal
राहुरी : राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्यांची दहशत पसरली आहे. शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी शेतकऱ्यांना घ्यावी लागत आहे. बंदुकीचा परवानाधारक एका शेतकऱ्याने बंदूक हाती घेऊन शेतमजूर महिलांच्या टोळीला खडा पहारा सुरू केला आहे. सतीश रमेश पवार (रा. खुडसरगाव असे शेतमजूर महिलांच्या टोळीला संरक्षण देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.