
अहिल्यानगर : नगर-पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी वाहनचालकांना कोयत्याचा धाक दाखवून लुटमार करण्याचे प्रकार वाढले आहेत. सोमवारी (ता. २८) पहाटेच्या सुमारास कारमधून प्रवास करणाऱ्या बहीण-भावाला लुटल्याची आणखी एक घटना नारायणगव्हाण (ता. पारनेर) शिवारात घडली आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर सुपा आणि नगर तालुका पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अशा प्रकारे लुटमार करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.