esakal | जैविक कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था 
sakal

बोलून बातमी शोधा

amc nagar

नगर-औरंगाबाद रस्त्यावर मटन विक्रेत्यांकडून रस्त्याच्याकडेला, ओढ्या-नाल्यांत अथवा रिकाम्या भुखंडात जैविक कचरा टाकण्यात येत असल्याची बाब माजी नगरसेवक निखिल वारे यांनी आज महापालिकेत मांडली. त्यानुसार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तातडीने घनकचरा व्यवस्थापनाची बैठक घेतली.

जैविक कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था 

sakal_logo
By
अमित आवारी

नगर : नगर-औरंगाबाद रस्त्यावर मटन विक्रेत्यांकडून रस्त्याच्याकडेला, ओढ्या-नाल्यांत अथवा रिकाम्या भुखंडात जैविक कचरा टाकण्यात येत असल्याची बाब माजी नगरसेवक निखिल वारे यांनी आज महापालिकेत मांडली. त्यानुसार महापौर बाबासाहेब वाकळे यांनी तातडीने घनकचरा व्यवस्थापनाची बैठक घेतली. या बैठकीत शहरातील मटन विक्रेत्यांकडील जैविक कचऱ्याच्या संकलनासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्याच्या सूचना महापौर वाकळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. 

अवश्‍य वाचा - महापालिकेने नागरिकांकडून घेतला साडेतीन लाखांचा दंड

निखील वारे यांनी महापौर वाकळे यांची आज भेट घेवून शहर व उपनगरातील रस्त्याच्या कडेने मटन विक्री करणारे स्टॉल मोठ्या प्रमाणात आहे. त्याद्वारे निर्माण होणारा जैविक कचरा मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेने फेकून देतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते अशा ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून यापूर्वी मोकाट कुत्रे लहान मुले, नागरिकांना चावा घेवून जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत. याकरिता टाकून मांसाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी वारे यांनी केली. त्याबाबत महापौर वाकळे यांनी आरोग्य विभागची बैठक घेतली. बैठकीला नगरसेवक कुमार वाकळे, माजी नगरसेवक निखील वारे, आरोग्य अधिकारी डॉ.नरसिंह पैठणकर, शहर अभियंता सुरेश इथापे आदी उपस्थित होते. 

महापौर वाकळे म्हणाले, शहर व उपनगरातील रस्त्याच्या कडेने असलेले मटन विक्रेते यांचा स्वच्छता निरिक्षक यांनी सर्व्हे करावा. त्यांनी रस्त्याच्या कडेने किंवा मोकळया जागेत टाकावू मांस टाकू नये यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात यावी. तसेच कचरा संकलनाचे ठेकेदार संस्था स्वयंभू ट्रान्सपोर्ट यांना टाकावू मांस प्रत्येक मास विक्रेत्याकडून गोळया करण्याकरिता स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात यावी असे आदेश दिले. मांस विक्रेत्यांनी टाकावू मांस कचऱ्याच्या गाडीतच टाकावे अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही ते म्हणाले.