

Shock Move: Complainant Faces Arrest Warrant in Murder Trial
sakal
पारनेर: निघोज येथील माजी सरपंच संदीप वराळ खून प्रकरणातील फिर्यादी असलेले मयत संदीप यांचे चुलते रंगनाथ वराळ यांना अहमदनगर सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. खटल्यात फिर्यादी असलेले रंगनाथ वराळ सतत प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या खटल्याचे कामकाज आठ वर्षांपासून प्रलंबित आहे.