

ATM broken open in Ralegan Siddhi; thieves decamp with ₹19.36 lakh, police probe underway.
Sakal
पारनेर: राळेगणसिद्धी येथील मध्यवस्तीत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम रात्री तीन वाजणेच्या सुमारास गॅस कटरच्या साह्याने फोडले. चोरट्यांनी १९ लाख ३६ हजार ९०० रुपये लांबविले. एटीएम फोडताना सायरन सुद्धा वाजला होता. आसपासचे लोकही जागे झाले. मात्र घाबरून कोणीही पुढे गेले नाही.