
राहुरी : देवळाली प्रवरा येथे बुधवारी पहाटे साडेचार वाजता सराईत चोरट्यांनी स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापले. एटीएममधील १० लाख ६५ हजार ८०० रुपये लंपास केले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक चारचाकी वाहन व तीन चोरटे चित्रीत झाले आहेत. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.