esakal | व्हॉलीबॉल खेळणाऱ्या तरूणावर भेंड्यात गोळीबार

बोलून बातमी शोधा

Attack on a young man playing on a college field
व्हॉलीबॉल खेळणाऱ्या तरूणावर गोळीबार
sakal_logo
By
प्रा. सुनील गर्जे

नेवासे : मित्रांसह व्हॉलिबॉल खेळत असलेल्या एका तरुणावर अज्ञातांनी गोळीबार केला. गोळी छातीत लागल्याने तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी संशयित दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. ही घटना रविवारी (ता. 2) रात्री साडेनऊच्या सुमारास भेंडे (ता. नेवासे) येथे घडली. (Attack on a young man playing on a college field

हेही वाचा: खासदार डॉ. सुजय विखे यांच्यातर्फे रेमडेसिव्हिर वाटप

सोमनाथ बाळासाहेब तांबे (वय 21, रा. भेंडे, ता. नेवासे) असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. त्याच्यावर नेवासे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भेंडे शिवारातील लांडेवाडी व जिजामाता महाविद्यालय परिसरातील मैदानावर रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जखमी सोमनाथ तांबेसह इतर नऊ-दहा तरुण व्हॉलिबॉल खेळत होते. दरम्यान, अंधारात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोमनाथवर गोळी झाडल्याने तो जखमी झाला. हल्लेखोर लगेचच दुचाकीवरून पसार झाले.

गोळीबाराची चौथी घटना

भेंडे महाविद्यालय परिसर गेल्या चार-पाच वर्षांत गुन्हेगारीचा अड्डा झाला असून, या परिसरात असलेल्या खासगी बंगल्यात स्थानिकांच्या मदतीने जिल्ह्यातील गुन्हेगारांना आश्रय दिला जातो. याच गुन्हेगारांच्या पाठबळावर स्थानिक गुन्हेगारांनी भेंडे- कुकाणे परिसरात दहशत पसरवली आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत या परिसरात दहशत पसरविण्याच्या हेतूने चार वेळा गोळीबार झाला आहे. (Attack on a young man playing on a college field)