esakal | खासदार डॉ. सुजय विखे यांच्यातर्फे रेमडेसिव्हिर वाटप

बोलून बातमी शोधा

MP Dr. Sujay Vikhe Patil
खासदार डॉ. सुजय विखे यांच्यातर्फे रेमडेसिव्हिर वाटप
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

टाकळी ढोकेश्वर (अहमदनगर) : खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी पुढाकार घेऊन जिल्हा सरकारी रूग्णालय, साईसंस्थान व प्रवरा ग्रामीण रुग्णालयासाठी रेमडेसिव्हिर इंजेक्‍शन आणले. यातून पारनेर तालुक्‍यातील गरजुंना ते वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जलसंधारण व्यवस्थापन समिती सदस्य राहुल शिंदे व डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी दिली.

शिंदे म्हणाले की, तुटवडा असताना ही काहिसा दिलासा देणारीही बाब आहे. मात्र, अद्यापही तुटवडा पूर्णपणे दूर झालेला नसल्याने त्यांनाही अपेक्षीत संख्येने इंजेक्‍शन मिळाले नसावेत. कोरोनाच्या दुसऱ्या टप्यातील संसर्ग वेगात होत असल्याने ज्येष्ठांबरोबरच तरुणांना देखील याची बाधा मोठ्या प्रमाणात झाली आहे. या इंजेक्‍शनचा तुटवडा निर्माण झाल्याने नातेवाईक भयभीत झाले आहेत. मात्र, डॉक्‍टरांनी त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

हेही वाचा: बनावट रेमडेसिव्हिर विक्रीप्रकरणी एकाला अटक

डॉ. भाऊसाहेब खिलारी म्हणाले, की रुग्णांनी भयभीत होण्याची गरज नाही. नातेवाईकांनीही रेमडेसिव्हिर या इंजेक्‍शनचा आग्रह धरू नये. इतर औषधांद्वारे या आजारावर उपाचार करता येतात. बाधितांना गरज पडेल त्यावेळी ते उपलब्ध करून देऊ. नागरिकांनीही लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करावे, जेणेकरून रुग्णालयांवर ताण पडणार नाही. रूग्ण लवकर बरे होऊन दुसऱ्या रुग्णांना जागा मिळेल. पुढील काही दिवसात या इंजेक्‍शनचा तुटवडा कमी होईल, रूग्णांना दिलासा मिळू लागेल.

नगरवर सरकारकडून अन्याय

विखे नगरची कोरोना आजार बाधित रूग्ण संख्या राज्यात दोन क्रमांकावर आहे. मृत्यू दरही वरच्या क्रमांकाचा आहे. मात्र, इंजेक्‍शन पुरवठा करताना जिल्ह्याचा क्रमांक 15 वा लागतो. हा नगरवर राज्य सरकारकडून अन्याय आहे.