

Harshvardhan Sapkal criticises the Home Minister after the attack on the Congress district president; political tensions rise.
Sakal
श्रीरामपूर : संविधान दिनी मुंबईवर २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला होता. आज देखील संविधान दिनीच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षावर हल्ला झाला, हा दहशतवादी हल्लाच आहे, असे परखड मत व्यक्त करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या घटनेसाठी जबाबदार धरले. राज्यातील पोलिसिंग पूर्णपणे संपुष्टात आले असून, पोलिसांची अवस्था होमगार्डसारखी झाल्याचा घणाघातही त्यांनी केला.