
संगमनेर : विधानसभेच्या निवडणुकीत जे झाले ते झाले आता तो विचार न करता आपल्याला पुढे जायचे आहे. काही लोकांना आपला संगमनेरचा सहकार पहावत नाही. तो शंभर टक्के त्यांच्याकडून मोडण्याचा प्रयत्न होणार असल्याने तसा प्रतिकारही आपल्याला करावा लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने लढाईची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.