
अहिल्यानगर : मागील भांडणाच्या कारणावरुन १५ ते २० जणांनी ८ जणांना घातक शस्त्राने मारहाण करुन खुनाचा प्रयत्न केल्याची घटना २४ जुलै रोजी दुपारी २.३० च्या सुमारास शिशू संगोपन शाळा चितळेरोड, गोगादेव मंदिरशेजारी नालेगाव येथे घडली होती. या प्रकरणी सोमवारी (ता. २८) तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.