

Political Relief for Kaka Koyte as Samata Inquiry Put on Hold
Sakal
कोपरगाव : समता पतसंस्थेची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने विरोधकांनी थकबाकीदारांच्या माध्यमातून दाखल केलेल्या अर्जावर समताची चौकशी सहकार मंत्रालयाने अखेर थांबविली आहे. संबंधित प्रकरणाची सखोल माहिती व कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतर ही चौकशी थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर सत्याचाच विजय झाला असून, समताला अडचणीत आणण्याचा विरोधकांचा डाव उधळला असल्याचे मत समता पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश (काका) कोयटे यांनी व्यक्त केले.