
अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखेने शहरासह जिल्हाभरातील दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. संगमनेर येथील काकडवाडीच्या महालक्ष्मी मंदिरातून देवीचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले. शेंडी, वांजोळी, घोडेगाव, श्रीरामपूर, तसेच शहरातील बुरूडगाव रोड परिसरातील चंगेडिया यांच्या घरात दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींनाही पकडले आहे. काही महिन्यांत अनेक सराईत आरोपींना एलसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.