esakal | Diwali Festival 2020 : विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनविले आकर्षक आकाशकंदील 
sakal

बोलून बातमी शोधा

Attractive sky lanterns made by students from waste materials

दीपावलीच्या काळात विविध उपक्रमांतून पर्यावरणरक्षणाचा प्रयत्न करणाऱ्या पानोडी व आश्वी खुर्द येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या वर्षीही टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व आकर्षक आकाशकंदील तयार केले आहेत.

Diwali Festival 2020 : विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनविले आकर्षक आकाशकंदील 

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : दीपावलीच्या काळात विविध उपक्रमांतून पर्यावरणरक्षणाचा प्रयत्न करणाऱ्या पानोडी व आश्वी खुर्द येथील बालपण स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या वर्षीही टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ व आकर्षक आकाशकंदील तयार केले आहेत. या वर्षी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिवाळीचा संकल्पही केला आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
विविध चित्तवेधक उपक्रमांतून शालेय शिक्षणाबरोबरच कायम कार्यरत असलेल्या बालपण स्कूलने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. ऑनलाइनच्या माध्यमातून आठ महिन्यांपासून सातत्याने शाळा व शिक्षकांच्या सहवासात असलेल्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने आकाशकंदील तयार केले आहेत. यासाठी त्यांनी घरातील निकामी कागद, कार्डशीट व वस्तूंचा वापर केला आहे.

यातून निकामी वस्तूंचा योग्य वापर झाल्याने पर्यावरणाचे रक्षण होत आहे. तसेच, स्वनिर्मित कलाकृतीचा आनंद त्यांना मिळाला आहे. चार वर्षांपासून फटाकेमुक्त दीपावलीचा संकल्प करून या शाळेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणरक्षणाचा विडा उचलला आहे. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी "बालपण'च्या प्रमुख सोनाली मुंढे, शिक्षक शांता नागरे, राजश्री बोऱ्हाडे, सुचिता बालोटे, सीमा आव्हाड, अश्विनी आव्हाड, स्नेहल अनाप, पल्लवी जाधव, वंदना घोडेकर यांनी परिश्रम घेतले. 

संपादन : अशोक मुरुमकर

loading image