esakal | पारनेरमध्ये असा घुसला कोरोना... तहसीलदारबाईंनी सांगितलेली राजा-राणीची कथा व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

AUDIO VIRAL OF TEHSLDAR MADAM

लक्ष्मणाने सीतेला घालून दिलेली लक्ष्मण रेषेचा आधार घेत लोकांनी घराबाहेर पडू नका अन्यथा ज्या पद्धतीने सीतेने रेषा लक्ष्मण रेषा ओलांडली त्यामुळे रामायण घडले, याची कथा या कोरोना आजाराला जोडत  लोकांनी घारबाहेर पडू नका असा संदेश दिला होता.

पारनेरमध्ये असा घुसला कोरोना... तहसीलदारबाईंनी सांगितलेली राजा-राणीची कथा व्हायरल

sakal_logo
By
मार्तंड बुचुडे

पारनेर ः कोरोना व्हायरस पारनेर तालुक्यात घुसला आहे. आणि तो लोकांना बाधवत आहे. एका व्यक्तीमुळे संपूर्ण तालुका घाबरून गेला आहे. नेमका हा व्हायरस कसा आला. तो कसा पसरला, याला लोकच कसे जबाबदार आहेत. त्या कोरोना व्हायरसची कूळकथा खुद्ध तहसीलदारबाईंनी सांगितली आहे. 

कथा रूपात त्यांनी कोरोनाची हिस्ट्री मांडली आहे. तो इतिहास व्हायरल होतो आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी यापूर्वीही ऑडीओद्वारे लोकजागृती केली आहे. देशात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर  व जिल्ह्यात लॉकडाउन झाल्या नंतर पहिल्या दिवसापासून त्यांनी सुमारे 40 ऑडीओ क्लिप तयार करून सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्या आहेत. आजचीही राजा राणीची गोष्ट सांगून काळजाला हात घालत खळकळीचे आवाहन करत त्यांनी लोकांचे  प्रबोधन केले आहे. 
    तहसीलदार देवरे यांच्या अशा अनेक क्लीप प्रसिद्ध  झाल्या व राज्यभरात गाजल्या आहेत. तालुक्यात कोरोना च्या आजाराने शिरकाव केल्या नंतर दोन दिवसापुर्वी मुंबईहून आलेल्या एकाचा या आजाराने  मृत्यू झाल्यानंतर त्याची सत्य कथा त्यांनी जनतेसमोर मांडली आहे. ती लोकांच्या काळजाला भिडेल अशा शब्दात देवरे यांनी क्लीप द्वारे प्रसिद्ध केली आहे. या ऑडीओमधून लोकांनी बोध ग्यावाव आपल्या वर्तनातसुधारणा करावी हा त्यांचा हेतू यात दिसत आहे. त्यांच्या अशा अनेक  क्लीप राज्यात गाजल्या आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांची नगरमध्ये गुंतवणूक


लॉकडाऊन झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून देवरे यांनी लोकप्रबोधनासाठी प्रेतक दिवशी एक ऑडीओक्लीप तयार करून ती सोशल मीडीयावर प्रसद्ध केली व लोकांचे प्रबोधन केले होते. त्या लोकांना आवडत आहेत. आजही त्यांनी राजा-राणीची गोष्ट अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी करून लोकांचे प्रबोधन केले आहे. 
या पुर्वी त्यांनी आपल्या घरातून बाहेर पडू नका यासाठी लक्ष्मणाने सीतेला घालून दिलेली लक्ष्मण रेषेचा आधार घेत लोकांनी घराबाहेर पडू नका अन्यथा ज्या पद्धतीने सीतेने रेषा लक्ष्मण रेषा ओलांडली त्यामुळे रामायण घडले, याची कथा या कोरोना आजाराला जोडत  लोकांनी घारबाहेर पडू नका असा संदेश दिला होता.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी नगरमध्ये गुंतवणूक

सुधीर फडके यांच्या शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात या गीताच्या चालीवर आधारीत त्यांनी शेवटचेच सांगते दादा थांबा तुम्ही घरात..अशा गीताची रचना करून ऑडिओ क्लिप तयार केली होती. तीसुद्धा खूपच गाजली होती. आजही त्यांनी तालुक्यातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर राजा राणीची गोष्ट सांगून लोकांच्या काळजाला हात घालत डोळ्यात अंजन घातले आहे.

लोकांनी कोरोनाच्या आजारात कोणती काळजी घ्यावी हे वारंवार सांगण्यासाठी या क्लिप तयार केल्या आहेत. त्यातून समाजाचे प्रबोधऩ व्हावे हा हेतू आहे. मनोरंजनातून कोणते नियम पाळावेत हे जनतेला समजावे, हाच या मागचा हेतू आहे. यातून मला प्रसिद्धी मिळावी हा माझा आजिबात हेतू नाही.

-ज्योती देवरे,

तहसीलदार पारनेर.