पारनेर शिवसेनेत धुमशान सुरूच... औटीसमर्थक म्हणाले, पराभवानंतर अौटी वाईट दिसू लागले काय

मार्तंड बुचुडे
शनिवार, 11 जुलै 2020

शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश आलेल्या नगरसेवकांच्या या टोळीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आमदार नीलेश लंके यांची दिशाभूल केली,

नगर ः विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विजय अौटी वाईट कसे दिसू लागले. औटी हेच मतदारसंघाचे भाग्यविधाते आहेत, असा घसा ताणून हेच नगरसेवक कुटुंबासह प्रचार करीत होते. याच पाच नगरसेवकांमध्ये निवडून येण्याची कुवत नाही. हे समजल्यानेच त्यांनी केवळ स्वार्थासाठी पक्ष बदलाचे नाटक केले, असा अारोप माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे व उद्योजक व नगरसेवक पती अर्जुन भालेकर यांनी पत्रकार परीषदेत केला.

आज पारनेर येथे झालेल्या पत्रकार परीषेदेत ते बोलत होते. शिवसेनेतून राष्ट्रवादीत व त्यानंतर पुन्हा शिवसेनेत प्रवेश आलेल्या नगरसेवकांच्या या टोळीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच आमदार नीलेश लंके यांची दिशाभूल केली, असेही त्यांचे म्हणणे आहे.

औटींबरोबर या पाच नगरसेवकांनी सुमारे साडेचार वर्ष नगर पंचायतीत काम केले. त्या वेळी यांना शहराचा विकास व्हावा असे वाटले नाही का औटी पराभूत झाल्यानंतरच यांना शहराचा विकास का आठवला. गेली साडेचार वर्षात यांनी शहराच्या पाणी प्रश्नाबाबत मासिक बैठकीत कितीवेळा आवाज उठवला. त्या नगरसेवकांनी स्वतःच सभांचे इतिवृत्त जनतेसमोर मांडावे, असे आव्हान चेडे व भालेकर यांनी या वेळी केले.

अडीच वर्षांपूर्वी निवडलेले नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी दिलेला उमेदवार योग्य नव्हता. त्यामुळेच आम्ही शिवसेनेपासून फारकत घेतली व सत्तांतर झाले. असे हे अाता सांगत आहेत. हे कितपत योग्य आहे. खरे आहे हे अाता त्यांच्या भूमिकेवरून दिसून येत आहे.

हेही वाचा - पिंपळगावच्या पाण्यावरून राजकीय उणीदुणी

सत्तांतरानंतर आज या नगरसेवकांना विकास दिसू लागला आहे. त्यांनी त्यांच्या प्रभागात किती विकास केला, हे जनतेला अाता दाखवून द्यावे असेही अावाहन या वेळी  केले. 

या उलट अता सत्तांतर झाल्या नंतर नगरपंचायतीने कोट्यावधी रूपयांची कामे केली आहेत. त्यात प्रामुख्याने विविध प्रभागातील  रस्ते, भाजी मार्केट, मटण मार्केट, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, दीड कोटी रूपये खर्चाचे पथदिवे, 760 घरकुले आदी कामे आम्ही मार्गी लावली आहेत. 

या विकासकामात या नगरसेवकांचे योगदान काय आहे याचेही त्यांनी आत्मपरीक्षण करावे. नगरसेवक नंदकुमार देशमुखांनी यांनी आपल्या प्रभागात किती विकास केला, असा थेट प्रश्नही उपस्थित करून तो त्यांनी जनतेला सांगावा असेही अवाहन केले.

जे नगरपंचायतीच्या बैठकांना कधी वेळेवर उपस्थित राहिले नाहीत, एखाद्या विकासकामाचा पाठपुरावा करण्याचे धाडस ज्यांनी दाखविले नाही. पाणी योजना सोडा, स्वतःच्या प्रभागातील विकास कामांसाठी त्यांनी काय योगदान दिले, हे एकदा जनतेसमोर सांगावेच, असे ते म्हणतात.

संपादन - अशोक निंबाळकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Auti supporters angered five councilors