esakal | रिक्षा चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
sakal

बोलून बातमी शोधा

auto-rickshaw-thief-arrested-in-ahmednagar-by-kotwali-police

रिक्षा चोरणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

sakal_logo
By
दौलत झावरे

अहमदनगर : बाजार समितीच्या आवारातील कष्टाची भाकरी या केंद्रासमोरून रिक्षा चोरणाऱ्या आरोपीला कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे. त्याने चोरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नीलेश गोरख शिंदे (वय 35, रा. भांबळ गल्ली, भोसले आखाडा, नगर) यांनी बाजार समितीच्या आवारातील कष्टाची भाकरी या केंद्रासमोर रिक्षा (MH-16-V-9994) लावली होती. अज्ञात चोरट्याने रिक्षाचे हॅण्डल लॉक तोडून रिक्षा चोरली. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: शिर्डीत होणार जिल्हा पर्यटन माहिती केंद्र; रोजगाराची संधी

आरोपी हा सराईत चोरटा

आयुर्वेद महाविद्यालय परिसर मंगळवारी (ता.7) रात्री एक तरुण संशयास्पद फिरत आहे, अशी माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने त्याला पकडले. त्याची अंगझडती घेतली असता, चाव्यांचा जुडगा आढळून आला. त्याला विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता, त्याने बाजार समितीच्या आवारातून रिक्षा चोरल्याची कबुली दिली आहे. सुरज दिलीप नरवडे (वय 26, रा. कोल्हेश्‍वरीनगर, तपोवन रस्ता, नगर) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याने चोरलेली रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे. सुरज नरवडे हा 2015 पासून लहान-मोठ्या चोऱ्या करत आहे. त्याने तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन तर कोतवाली हद्दीत एक चोरी केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: सभेला यायचं अन् उपाशी जायचं; सदस्यांची झेडपीच्या सभेत नाराजी

loading image
go to top