ayushman bharat card registration dr omprakash shete health insurance 5 lakh compensation
ayushman bharat card registration dr omprakash shete health insurance 5 lakh compensationSakal

Ahmednagar News : आयुष्यमान भारत कार्ड नोंदणीला गती द्या; डॉ. ओमप्रकाश शेटे

आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत स्वरूपात देण्यात येत आहेत.

अहमदनगर : सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून सामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत व अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत स्वरूपात देण्यात येत आहेत.

या योजनेंतर्गत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देण्याचे निर्देश आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडित नेहरू सभागृहात आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉ. ओमप्रकाश शेटे यांच्या उपस्थितीत आयुष्यमान भारत,

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील पायाभूत सुविधांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, आयुष्यमान भारत योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. वसीम शेख, जिल्हा समन्वयक डॉ. मयूर मुथा, जिल्हा समन्वयक रोहित कारंडे आदी प्रमुख उपस्थित होते.

डॉ. शेटे म्हणाले, की आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कोल्हापूर व अहमदनगर हे दोन जिल्हे कार्ड वितरणामध्ये राज्यात अग्रेसर आहेत. जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक करीत आहेत.

जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत इतर संबंधित शासकीय यंत्रणांनी गोल्डन कार्ड नोंदणी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी.

या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांच्या होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत. गोल्डन कार्ड नोंदणी आणि वितरणासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचनाही डॉ. शेटे यांनी यावेळी दिल्या. महापालिका क्षेत्रात कार्डची नोंदणी कमी असल्याने महापालिकेने गोल्डन कार्डची संख्या वाढविण्यासाठी सूक्ष्म नियोजन करीत या कामाचा दैनंदिन आढावा घ्यावा.

जिल्ह्यातील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी मोहिमेसाठी देवस्थान व्यवस्थापनाची मदत घ्यावी. त्याचबरोबरच प्रत्येक रुग्णालयामध्ये गोल्डन कार्ड नोंदणी व वितरणासाठी विशेष कक्ष सुरू करण्यात यावा.

जिल्ह्यातील सीएससी केंद्रांनी राष्ट्रकार्य म्हणून अधिकाधिक कार्डची नोंदणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. प्रारंभी आयुष्यमान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. मयूर मुथा यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती सादर केली. या बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

साडेबारा लाख कार्डचे वितरण

जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेंतर्गत ३१ लाख ६५ हजार १२५ लाभार्थ्यांपैकी १२ लाख ५१ हजार ७३३ लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले आहे. उर्वरित कार्डधारकांची नोंदणी करून कार्ड वितरणाची कार्यवाही सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com