
जामखेड : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त आदिवासी संयोजन समितीतर्फे मुंबईत आझाद मैदानावर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे. भटके-विमुक्तांना न्याय मिळेपर्यंत हा लढा चालूच राहणार असल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲड. अरुण जाधव यांनी व्यक्त केला आहे.