
नेवासे शहर : राम मंदिर बांधले. परंतु राम नावाचा शेतकरी आत्महत्या करतोय, त्याचं पाप फेडणार कुठे, महायुती सरकारने याचे उत्तर द्यावे. मंदिर बांधायचं आणि शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावायचं, जनतेला कर्मकांडामध्ये अडकून ठेवायचं काम हे महायुती सरकार करत आहे, अशी टीका प्रहार पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर केली.