नगर तालुका: सध्या जाती-धर्मांत वाद लावण्याचे सर्वच राजकीय पक्षांचे षडयंत्र सुरू आहे. लोक जाती-धर्मांत भांडले की, सरकारला कोणी प्रश्न विचारत नाही. निवडणुकीत भाजपचा एक हैं तो सेफ हैंचा नारा होता. आता अतिवृष्टीत नुकसान झालेले शेतकरी हिंदू नाहीत का? त्यांना का मदत केली जात नाही? असा सवाल करत जात, धर्म आणि राजकीय पक्षांत विभागल्यामुळे शेतकऱ्यांचे वाटोळे झाले आहे. त्यामुळे आता तरी एक होवून सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडा, असे आवाहन माजी मंत्री, प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी केले.