Ahmednagar News : संगमनेरमधील 'भगवा' मोर्चाला गालबोट; दोन गटात दगडफेक, तणावाची स्थिती निर्माण

Ahmednagar News
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्यातील भगव्या मोर्चाला गालबोट लागले आहे. या मोर्चानंतर मोठी दगडफेक झाली. दोन गटात मोठा राडा झाला. त्यामुळे अहमदनगरच्या समनापूर गावात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

या दगडफेकीमध्ये एकजण जखमी झाला असून अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. पोलीस घटनास्थाळी पोहचले असून शांत राहण्याचे सांगत आहेत. (Ahmednagar News)

संगमनेर येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून आज हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. वाढती गुन्हेगारी आणि लव्ह जिहाद विरोधात 'भगवा मोर्चा' काढण्यात आला होता. दरम्यान या मोर्चातून गावाकडे परतत असताना हा प्रकार घडला.

Ahmednagar News
BBC Tax Evasion : बीबीसीचा कांगावा उघड; ४० कोटींचा कर चुकवल्याची दिली कबुली - रिपोर्ट

मोर्चादरम्यान वाद नेमका कशामुळे झाला, याबाबत माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला आहे.

Ahmednagar News
Odisha Train Accident: तीन दिवस उलटले, अजूनही पटली नाही १०० मृतदेहांची ओळख; नातेवाईकांचा शोध सुरूच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com