Balasaheb Mundhe expanded his business and provided employment to many farmers.jpg
Balasaheb Mundhe expanded his business and provided employment to many farmers.jpg

बाळासाहेब मुंढे यांनी आपला व्यवसाय वाढवून १५० शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला रोजगार

अकोले (अहमदनगर) : देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबलीकरणात दुग्ध व्यवसायाने फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आजही भूमिहीन मजूरवर्ग, शेतकरी मोठय़ा प्रमाणावर या व्यवसायाचा उपयोग चरितार्थ चालवण्यासाठी करतात. थोडक्यात या कार्यक्षेत्राचे देशाच्या रोजगार निर्मिती व दारिद्रय़ निर्मूलनाच्या कामातील योगदान उल्लेखनीय आहे. या पारंपरिक व्यवसायात करिअर करायचे ठरवून बाळासाहेब मुंढे या आदिवासी अतिदुर्गम गावातील तरुणाने आपला व्यवसाय वाढविलाच. मात्र १५० शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. 

एका गाईपासून दूध व्यवसायाला सुरवात तर अमृतवाहिनी दुध संस्थेची स्थापना केली. १५० शेतकऱ्यांचे दोन हजार लिटर दूध संकलन मुंढेवाडी आदिवासी वाडीतील बाळासाहेब भाऊराव मुंढे या तरुणाने नोकरीच्या मागे न लागता दुग्ध व्यवसाय सुरू केला. व्यवसायातील अनेक संकटांना सामोरे जात आज तो व्यवसायात चांगलाच स्थिरस्थावर झाला आहे. बाळासाहेब यांनी खासगी कंपनीतील नोकरी सोडून गावाकडे परतून दूध व्यवसाय सुरू केला. त्यासाठीचे नियोजन, काटकसर, श्रम, सातत्य यांची सांगड घालून एका गाईपासून दूध व्यवसायाला सुरवात केली. 

घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने दूध व्यवसायासाठी लागणारे पुरेसे भांडवल नव्हते. वडिलोपार्जित देशी गाईचा संकर करून तिच्यापासून झालेल्या कालवडीचा सांभाळ केला. गाईंची संख्या वाढविण्याचे प्रयत्न सुरू झाले. तर हळू हळू १० गाईंचा आदर्श गोठा तयार केला. तर अमृतवाहिनी दूध संस्थेची स्थापना अमृतवाहिनी सहकारी दूध संस्था  स्थापन करून तिच्या माध्यमातून स्वतःचे ५० लिटर दूध अमृतसागर दूध संघाला डोक्यावर नेऊन घालत असे.

आदिवासी व अतिदुर्गम गाव असलेल्या शेलद, मुंढे वाडी, घिगे वाडी, मेचकर वाडी व परिसर येथील बहुतांश शेतकरी मजुरीसाठी पुणे नारायणगाव, अकोले या परिसरात जात, असे मजुरांचे गाव म्हणून परिचित असलेल्या या गावाची ओळख बाळासाहेब मुंढे नावाच्या तरुणाने पुसून टाकली. १५० शेतकऱ्यांना दूध संस्थेच्या माध्यमातून एकत्र करून आलेल्या नफ्यातून शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य केले. गाई, कालवडी घेऊन दिल्या. त्यामुळे दूध वाढले. दूध व्यवसाय चांगलाच फायदेशीर ठरला आहे.  

जनावरांचे संगोपन

बाळासाहेब यांच्या गोठ्यात १५ संकरित होल्स्टिन फ्रिजीयन गाईंचे संगोपन केले जाते. यापैकी १३ गाई सध्या दुभत्या तर पाच गाभण आहेत. नियमित ओला चारा उपलब्ध व्हावा, यासाठी आपल्या चार एकर क्षेत्रामध्ये ऊस, कडवळ, मका तसेच अन्य चारा पिके आलटून पालटून घेतली जातात. जनावरांसाठी कडबा कुट्टीचा वापरही केला जातो. नियमित संतुलित आहार दिल्यामुळे दूध उत्पादनात सातत्य टिकून राहते, शिवाय गाईंची शारीरिक क्षमताही चांगली राहते. याच पद्धतीने सहा ते १५ महिने वयाच्या सुमारे १४ संकरित कालवडींचेही संगोपन केले जाते. गोठ्यातील लहान-मोठ्या मिळून जवळपास ३० जनावरांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी काळजी घेतली जाते. गाईंना वर्षातून दोन वेळा लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लसीकरण, तर गोचीड प्रतिबंधक थायलेरियासिसचे एक वेळ लसीकरण केले जाते.

आदर्श गोठा व्यवस्थापन

दूध व्यवसायात वाढ करायची असेल तर प्रथम जनावरांच्या गोठ्याला आधुनिक व्यवस्थापनाची जोड द्यावी लागते. त्याप्रमाणे गोठा स्वच्छ, मोकळ्या वातावरणात ६० फूट लांब व २५ फूट रुंद उत्तर-दक्षिण उभारला आहे. गोठ्यातच चारा-पाण्याची सोय आहे. गरजेएवढेच पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाते. गोठ्यात रात्रभर पुरेसा प्रकाश राहावा, यासाठी हॅलोजन बल्बची व्यवस्था आहे. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशिनचा वापर केला जातो. दूध काढताना वीज गेली तर जनरेटरचा वापर केला जातो.

जनावरांच्या पैदास वाढीकडे लक्ष 

बाळासाहेब यांनी एका गाईपासून दूध व्यवसाय सुरू केला असल्यामुळे त्यांना प्रत्येक गाईचे महत्त्व पटले आहे. १५ वर्षांच्या आपल्या व्यवसायात आतापर्यंत ९० हून अधिक कालवडींची पैदास त्यांनी वाढवली आहे. त्यातील काही आपल्याकडे ठेवल्या. काहींची विक्री केली. दोन वर्षे वयापर्यंतच्या प्रति कालवडीची पैदास करण्यासाठी किमान ४०  ते ४५ हजार खर्च येतो. यातून आतापर्यंत २० गाईंचे संगोपन केले.

उत्पादक शेतकरी विजय श्रावण घिगे म्हणाले, दुग्ध व्यवसायामुळे दूध उत्पादक शेतक-यांना आवश्यक अन्न दूध मिळते. तसेच दारिद्र्य रेषेखालील लोक, सुशिक्षित बेरोजगार यांना देखील या व्यवसायापासून रोजगार मिळतो. दुधाच्या विक्रीतून चांगला आर्थिक फायदा होऊ लागला, त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढण्यास भर दिला. आज माझ्याकडे १५ गायी आहेत. बाळासाहेब यांनी अमृतवाहिनी दूध संस्थेकडून मला चार लाख रुपयाची मदत केली. सध्या माझे २००  लिटर दूध जाते ते ५०० पर्यंत नेण्याचे माझे उद्धिष्ट आहे.
  
बल्क मिल्क कुलर मशीन

अमृतसागर दूध संघाचे अध्यक्ष वैभव पिचड यांनी उष्णता रोधक शीत टाकीची व्यवस्था केली असून त्यामुळे परिसरातील १५० दूध उत्पादकांचे दोन हजार लिटर दुध संरक्षित राहते. अकोले तालुक्यातील अमृतवाहिनी आदिवासी सहकारी दूध संस्थेने १५० दूध उत्पादक शेतकऱ्यांना दोन टक्के रिबित व प्रत्येकी १० किलो साखर देऊन त्यांची दिवाळी आनंदाची केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मुंढे यांनी २००५ ला दूध संस्थेची स्थापना करून आदिवासी भाग असलेल्या शेलद, मुंढे वाडी, मुठे वाडी, घिगे वाडी, चींचवणे, मेच कर वाडी, सकिर वाडी आदी दहा गावातील दूध संकलन करून २००० लिटर दूध अमृतसागर दूध संघाला पाठवून दिली. दहा वर्षांपासून प्रथम क्रमांकाचे बक्षीस घेतात.

अमृत वाहिनी दूध संस्थेने रोजगारासाठी नारायणगाव, अकोले, जुन्नर येथे राहणाऱ्या गरीब आदिवासी मजुरांना ५० हजार ते चार लाखापर्यंत केवळ एक टक्के वर कर्ज देऊन दुभत्या गायी घेऊन दिल्या. एक गायी पासून सुरुवात केलेल्या ज्ञानेश्वर घीगे या गवंडी मजुराने आपल्या गोठ्यात १९ गायी सांभाळून त्यापासून त्याला वर्षाला चार ते पाच लाख रुपये नफा मिळतो, त्याच्यासोबत त्याचे सर्व कुटुंब सकाळपासून काम करून २०० लिटर दूध संस्थेला पाठवत आहे. त्यामुळे या परिसरातील अनेक तरुण बेरोजगारी झटकून टाकत रोजगाराकडे वळले आहे. 

मुंढेवाडी शेलद अमृतवाहिनी दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब मुंढे म्हणाले, मी नोकरीच्या मागे न लागता अमृत वाहिनी दूध संस्था स्थापन केली. तत्कालीन आमदार व अमृतसागर दूध संस्थेचे अध्यक्ष वैभव भाऊ पिचड यांनी मला बरक्युलार मशीन दिले, त्यामुळे दूध खराब होत नाही, तसेच दूध काढण्यासाठी २५ मशीन दिल्याने या परिसरातील १५० शेतकरी दूध व्यवसाय करत असून दीड ते दोन हजार दूध संकलन होऊन येथील गरीब आदिवासी, तरुण, महिला यांच्या हाताला रोजगार उपलब्ध झाला आहे. आज प्रत्येक कुटुंबात किमान ५०लिटर दूध उपलब्ध होते. गावात बिगर दूधाचा चहा होत नाही. 

आमचे उद्दिष्ट पाच हजार लिटरचे असून प्रत्येक गावात दुधाळ जनावरे देण्याचा आमचा मानस आहे. तर ज्ञानेश्वर घिगे यांनी मी मजुरी करत होतो. आज महिन्याला ४० हजार कमवतो. विजय घि गे याने मुंबई येथील नोकरी सोडून गायी घेतल्या बाळासाहेब मुंढे यांनी त्यांना चार लाख रुपये दिले.  त्यांच्याकडे १५ गायी आहेत. दूध व्यवसायावर २० लाखाचा बंगला बांधला आहे. त्याचे २०० लिटर दूध जाते. त्याला ५०० लिटरपर्यंत दूध व्यवसाय घेऊन जायचा आहे. तर दुग्ध व्यवसायातील उत्पादन- उत्पन्न सध्या दुभत्या १७ गाई आहेत. त्यांच्यापासून दररोज दोन वेळचे मिळून २७५  ते ३०० लिटर दूध मिळते. दुधाला ३.९  ते चार फॅट मिळते. त्यामुळे प्रति लिटर २५  रुपये दर मिळतो. दुधाची जागेवरच अमृतसागर दूध संघाला विक्री होते. 

दैनिक अर्थशास्त्र

सुमारे २० गाईंसाठी दैनंदिन चारा, औषधे, देखभालीसाठी दररोज सुमारे चार हजार रुपये खर्च होतो. यात दोन हजार रुपयांचे पशुखाद्य, ६०० रुपयांचा भुसा, मिनरल मिक्स्च्र १०० रुपये, दोन मजुरांची ५०० रुपये मजुरी, देखभाल व औषधांसाठी 200 रु., तर ओला व सुक्या चाऱ्यासाठी ५०० रु. असा हा खर्च आहे.

वर्षभरातील अतिरिक्त उत्पादन

लहान- मोठ्या मिळून २५ जनावरांपासून दरवर्षी सुमारे ५५ ट्रॉली शेणखत मिळते. सध्या तीन ते चार हजार रुपये प्रति ट्रॉली शेणखताचा दर आहे. त्यातून दोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. दरवर्षी किमान १२  ते १५ नवीन कालवडी विक्रीसाठी तयार होतात. किमान १८ महिने वयाच्या प्रति कालवडीपासून १५ ते २०  हजार रुपये मिळतात. शेणखतापासून मिळालेले पैसे जनावरांच्या खाद्यासाठी वापरले जातात. त्यामुळे दूध व कालवडीपासूनचे उत्पन्न फायद्यात राहते, असे बाळासाहेब  म्हणाले.

गोमूत्राचा वापर पिकांसाठी

गोठ्यातून बाहेर पडलेले मूत्र एका खड्ड्यात साठवले जाते. तेथून पाइपमधून ते थेट शेतापर्यंत म्हणजे मका, कडवळ व अन्य चारा पिकांपर्यंत पोहचवले जाते. जमिनीची प्रत वाढविण्यासाठीही त्याची चांगली मदत झाली आहे. स्लरी व गोमूत्रामुळे चारा पिकांना रासायनिक खतांचा वापर मर्यादित केला जातो.

दुग्ध व्यवसाय झाला कुटुंबाचा आधार !

बाळसाहेब यांनी या दूध व्यवसायातून टप्प्याटप्प्याने कुटुंबाची प्रगती साधली आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने बाळासाहेब यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. सध्या ते अमृत वाहिनी संस्थेचे अध्यक्ष आहेत. जनावरांचे संगोपन एक आदर्श म्हणून गोठा व्यवस्थापन जनावरांच्या पैदास वाढीकडे लक्षगिरची केली. पैदासदुग्ध व्यवसायातील उत्पादन- उत्पन्न दैनिक अर्थशास्त्र वर्षभरातील अतिरिक्त उत्पादन गोमूत्राचा वापर पिकांसाठी दुग्ध व्यवसाय कुटुंबाचा आधार झाला. 

शेलद मुंढेवाडी अमृत वाहिनी सह.दूध संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब मुंढे म्हणाले, मी २००५ पासून दूध व्यवसाय करत आहे. अगोदर अमृतसागर दूध संस्थेचे अध्यक्ष वैभव पिचड यांनी मला दूध संकलनासाठी आर्थिक मदत केली. त्यामुळे मी गरीब शेतकऱ्यांना संस्थेमार्फत एक टक्के व्याजाने गायी घेण्यासाठी मदत दिली. त्यामुळे मजुरीसाठी नारायणगावाला जाणारे गावातील तरुण, महिला यांनी दुध व्यवसाय सुरु केले तर ज्ञानेश्वर घिगे हा मजूर आज १८ गायी सांभाळतो व ५ लाख रुपये वर्षाला मिळवतो. 

आज दोन हजार लिटर दूध जाते. १५० पैकी १०० तरुण शेतीला जोड धंदा म्हणून दुधाव्यवसाय करतात. किमान महिन्याला ३० हजार त्यांच्या हातात पडतात. नोकरी व रोजगारासाठी त्यांची भटकंती थांबली आहे. तर दहा लाखाची मशनरी आमदार वैभव पिचड यांनी दिल्याने दुध संरक्षित राहते. ५००० लिटर दूध संकलनाचे आमचे उद्धिष्ट असून प्रत्येक घरटी दूधाला जंवर देण्याचा आमचा विचार आहे. तर शेतकरी १० किलोमीटर पायी मोटर सायकलवर येऊन दूध घालतो तर रोज अमृतसागर दूध संघाचा ट्रक येऊन दूध घेऊन जातात. दिवाळीला १० किलो साखर व दोन टक्के रीबिट देण्यात आले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com