Balasaheb Thoratsakal
अहिल्यानगर
Balasaheb Thorat : ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात: बाळासाहेब थोरात; आयोगाचे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम !
EVM tampering : माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ईव्हीएमबाबत गंभीर शंका उपस्थित करून राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. “ईव्हीएमबाबत ते काहीही करू शकतात,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांकडून निवडणूक आयोगावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला.
संगमनेर: लोकशाही प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे निवडणूक आणि मतदान. ही प्रक्रिया निर्दोष, पारदर्शक व कोणत्याही संशयाला वाव न देणारी असली पाहिजे. तथापि, आजच्या घडीला निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी टीका माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये माध्यमांशी बोलताना केली.
