Balasaheb Thorat
sakal
अहिल्यानगर: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. त्यात मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. परंतु सरकारला त्याचे कोणतेच गांभीर्य नाही. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तत्काळ भरीव मदत आणि कर्जमाफी जाहीर करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी, अशी मागणी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषदेत केली.